जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची मनमानी

Foto
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी विविध कारणाने महत्त्वाचं असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी करत असल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. कार्यालय प्रमुखांचा वचक कमी झाल्यामुळे अधिकारी मनमानी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन वरिष्ठांनी मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.

         महा विकास आघाडी सरकारने पाच दिवसाचा आठवडा जाहीर केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. मात्र याचा फटका विविध कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचे दिसून येते. कारण जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पाच दिवसाचा आठवडा झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत बदल केलेला असतानाही कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे सोमवारी दिसून आले. उशीरा येणार्‍या कोणत्याही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात करण्यात आल्याचे दिसून येत नाही. कार्यालयात उशिरा आल्यानंतरही आपल्यावर कोणतीच कारवाई होत नाही यामुळे दिवसेंदिवस अधिकारी आणि कर्मचारी हे बिनधास्तपणे कार्यालयात वावरत आहेत विविध कामासाठी आलेल्या नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे या कार्यालयातील वरिष्ठांचा आपल्या कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वचक राहिलेला नाही. अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. आता पाच दिवसाचा आठवडा झाल्यामुळे कामाची गती वाढेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी येत नाहीत, तसेच आल्यानंतरही काम करत नसल्याच्या चर्चा लोकांमध्ये होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कामात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी जोर धरत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker